Share

Rohit Pawar | राकेश वाधवान मनी लॉन्डरिंग प्रकरणी रोहित पवार अडकणार ? पवार ED च्या रडारवर

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | मुंबई : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ईडी आणि सीबीआयच्या छापेमारी सुरु आहेत. महाविकासाआघाडीतील अनेक बडे नेते ईडीच्या रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली. तर पुढे भाजप नेते मोहित कंबोज यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचा आणखीन एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असं ट्विट केलं होत. या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तर कंबोज यांचा रोख हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर असल्याच्या चर्चा देखील सुरु होत्या. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

रोहित पवार यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. कारण रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा. लि. कंपनीच्या प्राथमिक चौकशीचे आदेश ईडीने दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहित पवार यांच्यासह राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते. राकेश वाधवान व सारंग वाधवान हे दोघेही सध्या येस बँक बँकेतील घोटाळ्या प्रकरणी आरोपी आहेत. यानंतर वाधवान बंधूंचे नाव बँक घोटाळा प्रकरणात आल्यानंतर रोहित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे समजते.

काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. त्यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन 2006 ते 2012 पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेंद्र पवार हे देखील या कंपनीत सन 2006 ते 2009 या कालावधीत संचालक होते. या कंपनीत आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ईडीला मिळाली असून या तक्रारीवरुन ईडीचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

ग्रीन एकर्स प्रा. लि. कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठवण्यात आली, तसेच देशात आली. याची चौकशी व्हावी अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. या तक्रारीवरुन प्राथमिक तपास सुरु झाला आहे. रोहित पवार यांचे वाधवान यांच्याशी संबंध आहेत, का हेही तपासले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती कंपनीने लपवून ठेवल्याचेही आरोप आहेत.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!