🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौरे दरम्यान आपल्या आईची भेट घेतली. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी अर्धा तास आपल्या आईची भेट घेतली. संध्याकाळी साबरमती नदीवरून अटल पुलाचे उद्घाटन आणि खादी महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावर त्यांनी आई हिराबेन मोदी यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.
नरेंद्र मोदी यांनी घेतली त्यांच्या आईची भेटः
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी याबाबतची माहिती दिली. गुजरात दौराच्या दुसऱ्या दिवशी अर्थात अखेरच्या दिवशी नरेंद्र मोदी हे कच्छ आणि गांधीनगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास सहभागी झाले होते. त्याआधी शनिवारी त्यांनी साबरमती नदीवरील अटर ब्रिज या फूट ओव्हर ब्रिजचं उद्घाटन केलं.
संध्याकाळी खादी महोत्सव कार्यक्रमालाही नरेंद्र मोदींनी हजेरी लावली असून त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पुन्हा साबरमती नदीच्या गोण कठांणा जोडणार तर आहे पण तो डिझाईन आणि अध्यायवत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, संध्याकाळी उशिरा नरेंद्र मोदी यांनी आईसाठी अर्धा तास भेट दिली त्यानंतर ते पुन्हा राजभवनाकडे रवाना झाले. राजभवनावर त्यांनी रातभर विश्रांती करत मुक्काम केला. नरेंद्र मोदी हे शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस गुजरात दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या गुजरात दौराचा दुसरा दिवस आणि अखेरचा दिवस आहे.
महत्वाच्या बातम्याः
- India vs Pakistan | सामन्यापूर्वीच पाक संघाला भारताचा धाक! पाकिस्तानी माजी गोलंदाजाचं मोठं वक्तव्य
- India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला! असा पाहा LIVE
- Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांना राज्यपाल यांच्याकडून मोठा झाटका, व्हि. के. सक्सेना यांनी ‘इतक्या’ फाईल्स परत पाठवल्या
- Shivsena । “गुन्हेगारांना माफी हा तर बिल्किस बानोवर अन्याय, हेच का तुमचं हिंदुत्व?”, शिवसेनेचा रोकठोक सवाल
- Amol Mitkari। काय ते मंत्री? काय त्यांचे नाव? काय त्यांचा दौरा? एकदम OK; मिटकरींची सामंतांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
