Share

India vs Pakistan | सामन्यापूर्वीच पाक संघाला भारताचा धाक! पाकिस्तानी माजी गोलंदाजाचं मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत सातत्याने वक्तव्ये येत आहेत. या सामन्याबाबत प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद याने आपल्या संघाला दोन भारतीय खेळाडूंपासून मोठा धोका असल्याचे सांगितले आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यापासून पाकिस्तानी संघाला जास्त धोका असल्याचे त्याने म्हटले आहे. याशिवाय त्याने हार्दिक पांड्याचे देखील नाव घेतले आहे.

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज रविवार (28 ऑगस्ट) रोजी सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 पासून सामन्याला सुरुवात होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. दोन्ही संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. दुसरीकडे, आकिब जावेदचा विश्वास आहे की, भारतीय संघाचा अव्वल क्रमांक लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवला तरच त्यांचा पराभव होऊ शकतो. तसेच शाहीन आफ्रिदीच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला थोडा दिलासा मिळेल.

जेव्हा कोहली दडपणाखाली येतो-

आकिब जावेदने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना पाकिस्तानसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ टीव्हीवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, ‘भारतीय संघ पहिल्या फळीतील विकेट पडली तरच हारेल. कारण जेव्हा कोहली दडपणाखाली येतो तेव्हा त्याला फॉर्ममध्ये येणे कठीण होईल. मात्र, पाकिस्तानला वरच्या फळीतील रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यापासून मोठा धोका आहे आणि हार्दिक पांड्या खालच्या फळीत धोकादायक ठरू शकतो.”

सूर्यकुमार यादव मैदानात सर्वत्र खेळतो-

आकिब जावेद पुढे म्हणाला, “सूर्यकुमार यादव हा असा फलंदाज आहे जो मैदानात सर्वत्र खेळतो. अशा परिस्थितीत एखाद्या गोलंदाजाला त्याला बाहेर काढावे लागते कारण आपण त्याला जास्त काळ धरून ठेवू शकत नाही.”

सूर्यकुमार यादवचा फॉर्म खूपच चांगला-

सूर्यकुमार यादवचा अलीकडचा फॉर्म खूपच चांगला आहे पण त्याला पाकिस्तानविरुद्ध अनेक सामने खेळण्याचा अनुभव नाही. T20 विश्वचषकात तो पाकिस्तानविरुद्ध फक्त एकच सामना खेळला होता ज्यात तो फ्लॉप ठरला होता.

कुठे पाहणार सामना –

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल. तसेच Disney+Hotstar अ‍ॅपवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2022 सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

भारताची संभाव्य प्लेइंग 11 –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!