Share

Karuna Munde | 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी करुणा मुंडे यांनी नोंदवला गुन्हा, आरोपी धनंजय मुंडेंच्या परिचयाचे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी 30 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात भारत संभाजी भोसले, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करुणा मुंडे यांनी नोंदवला गुन्हाः

करुणा मुंडे यांची या गुन्हेगारांसोबत ओळख होती. ओळखीतून त्यांनी मुंडे यांचा विश्वास संपादन केला व आमची लेव्हलसेट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून या कंपनीमध्ये तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला प्रचंड फायदा होईल असं मुंडे यांना सांगण्यात आलं होतं.

30 लाखांची फसवणूकः

ठरवल्याप्रमाणे मुंडेंनी जानेवारीमध्ये रोख रखम आणि धनादेश स्वरूपात एकूण 30 लाख रुपये दिले होते. मात्र फेब्रुवारीमध्ये मुंडे यांना एकदमच 54 हजार रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी संबंधितांकडे पैसे मागितले असता त्यांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आली. खोटे गुन्हामध्ये फसवण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याचं देखील मुंडेनी या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, भारत भोसले यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी दिलेल्या फर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. भोसले माझे पती धनंजय मुंडे यांच्या परिचयाचे आहेत. ते नेहमी आमच्या मुंबईतील घरी येत – जात असल्याने माझी देखील त्यांच्यासोबत ओळख असल्याचं करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!