Share

“उत्तरप्रदेशच्या शाळांमध्ये मराठी शिकवा, महाराष्ट्रात नोकऱ्या मिळतील”; भाजप नेते कृपाशंकर सिंग

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशातून आणि एकूणच उत्तरभारतातून युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी मुंबईत आणि महाराष्ट्राच्या इतर शहरात येत असतात. परप्रांतीय लोंढ्यांवरून मागील दीड एक महाराष्ट्रात जोरदार राजकारण झाले. अनेक वादविवाद घडून आले. आता मात्र या वादाचा आणखी एक नवा अंक आता पहायला मिळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामागचं कारण म्हणजे अलीकडेच भाजप मध्ये दाखल झालेले नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवलेलं पत्र आहे. या पत्रात कृपाशंकर सिंग यांनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश राज्यात मराठी भाषेबद्दल एक महत्त्वाची सूचना केली आहे.

कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याबाबत विनंती केली आहे. उत्तरप्रदेशातील तरुणांना मराठी येत असेल तर त्यांना मराठीत सरकारी नोकरी मिळण्यास सोप्प होईल, असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील सूचना योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचाराधीन आहे. प्रयागराज जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मागील पाच दशकाहून अधिक काळ कृपाशंकर सिंह मुंबईमध्ये राहतात. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. उत्तरप्रदेशातून अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्रात नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठी येतात. मात्र, मराठी भाषेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्या हेतूने कृपाशंकर सिंह यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे पत्र लिहिलं आहे.

आता उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या सूचनेचे सकारात्मक विचार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लवकरच उत्तरप्रदेश मध्ये मराठी भाषा विध्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळण्याची संधी मिळणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!