Share

“सोनियांच्या चरणी आणि पवारांच्या खांद्यावर…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंगालमध्ये दिदींनी जसं भाजपला गाडल, ती वेळ महाराष्ट्रात आलीये असे म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

“घरबसली पोपटपंची….गाडायचं कोणाला हे जनतेचं ठरलं आहे आणि हो, ममता बॅनर्जी कशाही असल्या तरी बहुमत घेऊन सत्तेवर आल्या आहेत. सोनियांच्या चरणी आणि पवारांच्या खांद्यावर बसून त्यांनी लाचारीने सत्ता मिळवलेली नाही.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान कोणी कितीही प्रयत्न केले, तरी महाविकास आघाडी भक्कम असून मविआचे चारही उमेदवार निवडून येतील. बंगालमध्ये ममता दीदींनी भाजपला जसं गाडलं, आता तीच वेळ महाराष्ट्रात आली आहे. राज्यसभेपाठोपाठ होणारी विधानपरिषदेची निवडणूकही आपण जिंकू, मतदानापूर्वी एकत्र राहा. मविआचे चारही उमेदवार निवडून आणा. असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!