मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संघटक श्रीकांत भारतीय, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उमा खापरे आणि भाजप नेते प्रसाद लाड या पाच नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या सर्वांचे उमेदवारी अर्ज आता दाखल करण्यात येणार आहेत. यात विशेष बाब म्हणजे भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना यावेळेस ही डावलण्यात आले आहे. राज्यसभेनंतर विधान परिषदेतही त्यांना डावलण्यात आलं आहे. पण तिकीट नाकारलं असलं तरी दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी पंकजा यांच्यासाठी खास निरोप पाठवल्याचे समजते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आपल्याला विधानपरिषद मिळालं तर त्याचे सोने करेन असे, पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. त्यामुळे त्या विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची जोरदार चर्चा होती. पण आता त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उमा खापरे यांना संधी देण्यात आली. यानंतर आता दिल्लीतून मुंडे यांच्यासाठी निरोप आले असल्याचे समजते. पंकजा मुंडेंनी विधानसभेला परळी विधानसभा जिंकावी, असं दिल्लीतून पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याचे समजत आहे. यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान विधान परिषदेसाठी २० जूनला निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी एका सदस्याला २७ मतांची गरज असणार आहे. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ ११३ आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३, शिवसेना ५६ आणि कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत. एक जागा दोन्हीकडून जास्त लढवण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे – संजय राऊत
- “मुंबईत कुठला आमदार पळून तर…”, मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंचा टोला
- “तुम्ही पिक्चरमध्ये या, मी राजकारणात जातो” ; नानांची मुश्रीफांना गुगली
- क्रिकेटच्या सामन्यात एकही चेंडू न टाकता दोन फलंदाज झाले बाद; नेमकं काय घडलं असेल? वाचा!
- लग्नाच्या चर्चांवर सोनाक्षी सिन्हानं अखेर सोडलं मौन, म्हणाली…

