Share

नयनतारा आणि विग्नेशचे लग्न होणार कडेकोट सुरक्षितेत! पाहुण्यांना दिला जाणार विशेष ‘कोड’

Published On: 

मुंबई :  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दिग्दर्शक विग्नेश शिवनला याच्यासोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. मागच्या सात वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. हे जोडप ९ जून रोजी लग्न करणार आहे. जवळच्या लोकांकडून माहिती येत आहे की, लग्न फक्त जवळचे कुटुंब आणि इंडस्ट्रीतील मित्रांच्या उपस्थितीत होणार असून सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

माहितीनुसार, लग्नाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ज्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यांना लग्नाआधी विशेष कोड दिला जाणार आहे. हा कोड दाखवल्यानंतरच लग्नामध्ये प्रवेश दिला जाईल.

नयनतारा आणि विग्नेश यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना भेट देऊन लग्नाचे आमंत्रण दिले आहे. यांचा लग्नसोहळा चेन्नईतील महाबलीपुरम या ठिकाणी पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. ‘नामुन राऊडी धान’या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. हे दोघे २०१५ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!