🕒 1 min read
मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलेच रंगू लागले आहे. भाजपकडून सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. त्यात मत फुटू नये, यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली असून यानंतर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
“येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मनसेचे मत भाजपाला मिळावे म्हणून मी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती केली आहे. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आमदारांना सांगितले आहे. त्यामुळे आमचा विजय आणखी सोपा होणार आहे.”, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
येत्या दोन दिवसांनंतर अर्थातच १० जून रोजी राज्यसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय हालचाली होताना दिसून येत आहेत. दरम्यान दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच, असे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “संभाजीनगर नामांतर करणार अशा आश्वासनाचे गाजर…”, केशव उपाध्येंचा उद्धव ठाकरेंना टोला
- ‘मविआ’च्या राज्यसभा निवडणूक बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
- जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खानने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…
- राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे – संजय राऊत
- “मुंबईत कुठला आमदार पळून तर…”, मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
