🕒 1 min read
मुंबई : द काश्मिर फाईल्सच्या नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे, देशातील अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी काश्मिर फाईल्सचं कौतूक केलं आहे. त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. परंतु त्यांच्यावर यापूर्वी झालेले काही आरोपही सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात अभिनेत्री तनुश्री दत्तानं त्यांच्यावर केलेला मी टू चा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे.
तनुश्रीनं विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत 2005 मध्ये चॉकलेट नावाचा चित्रपट केला होता. त्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी माझ्याकडून काही चूकीच्या मागण्या केल्या होत्या. दरम्यान प्रसिद्ध अभिनेते इरफान खान आणि सुनील शेट्टी य़ांनी माझी बाजुही घेतली होती. अशा प्रकारचे आरोप तनुश्रीनं केले होते. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी आपली बाजु मांडली होती. सोशल मीडियावर एक स्टेटमेंटही व्हाय़रल केले होते. तनुश्रीनं आपल्यावर जे आरोप केले आहेत तो तिचा पब्लिसिटी स्टंट आहे. तिनं जाणीवपूर्वक वेगळ्या हेतुनं हे आरोप केल्याचे अग्निहोत्री यांनी सांगितलं होतं. तनुश्रीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अग्निहोत्री यांच्यावर वेगवेगळे आरोप केले होते.
The Press Release. pic.twitter.com/CGazoCck7v
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 4, 2018
तनुश्रीनं केलेल्या आरोपानंतर विवेक अग्निहोत्री यांनी एक मोठं स्टेटमेंट जाहिर केलं होतं. त्यात त्यांच्या वकिलांनी तनुश्रीनं केलेले आरोप कसे खोटे आहेत हे सांगितले होते. अग्निहोत्री यांच्या वकिलानं लिहिलं होतं की, माझ्या अशिलाच्या विरोधात तनुश्रीनं जे काही आरोप केले त्यात त्यांची मोठ्या प्रमाणावर मानहानी झाली आहे. हे सगळं पद्धतशीर तयार करण्यात आले आहे. त्यामागे जाणीवपूर्वक अग्निहोत्री यांची बदनामी करायची होती हे दिसून आले आहे. सगळं काही लोकप्रियता मिळवण्यासाठी करण्यात आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेतून ते आरोप केले होते. त्यातून त्यांची स्टंटबाजी दिसून आली होती. या नोटीशीनंतर तनुश्रीच्या विरोधात मानहानीचा दावा देखील दाखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
