Share

“कसलीही सुरक्षा न घेता महाराष्ट्रात फिरून दाखवा”, गोपीचंद पडळकरांचे संजय राऊतांना थेट आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण रंगले असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मोदी -शहांच्या राज्यात हे असे का घडावे? लोकांना भयमुक्त, शांतपणे का जगता येऊ नये? सरसकट होलसेलात ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची वेळ मोदी सरकारवर का यावी? असे म्हटले. यावरूनच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) थेट आव्हान दिले आहे.

‘राऊत तुम्ही वाय दर्जाच्या सुरक्षेबाबत लेख लिहिता. पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात बिनधास्त फिरवून दाखवा. म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल.’,असे आव्हान गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना दिले आहे.

देशातील वातावरण मोकळे व सुरक्षित राहिलेले नाही. केंद्र सरकारने ऊठसूट ‘वाय’ किंवा ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा जो सपाटा लावला आहे त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे मोदी-शहांच्या काळात मोकळेपणाने जगण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. लोकांना उगाच भय वाटते. हे भय टोकाचे आहे. मात्र भाजपपुरस्कृत भयग्रस्तांना केंद्र सरकार खास सुरक्षा व्यवस्था पुरवीत आहे. असे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!