Share

बधाई हो..! IPL 2022पूर्वी स्टार क्रिकेटर अडकला विवाहबंधनात; तब्बल ५ संघाकडून खेळलाय आयपीएल!

Published On: 

🕒 1 min read

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साऊदीने रविवारी त्याची गर्लफ्रेंड ब्रायासोबत लग्नगाठ बांधली. टिमने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचा फोटो शेअर केला आहे. आयपीएल २०२२मध्ये २६ मार्च रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात साऊदी कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दिसू शकतो.

साऊदी त्याची गर्लफ्रेंड ब्राया हिला बऱ्याच दिवसांपासून डेट करत होता, दोघांनी २०१९ मध्ये साखरपुडा केला. साऊदीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लग्नाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये फॉरएव्हर असे लिहिले आहे. या फोटोमध्ये हे जोडपे एकमेकांच्या डोळ्यात बघताना खूप आनंदी दिसत आहेत.

याशिवाय आयपीएल फ्रेंचायझी कोलकातानेही साऊदीचे अभिनंदन केले आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मेगा लिलावात कोलकाताने साऊदीला १ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले. साऊदी आयपीएलमध्ये अनेक संघांसाठी खेळला आहे. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांसाठी खेळला आहे. आतापर्यंत त्याने खेळलेल्या ४३ आयपीएल सामन्यांमध्ये ३१ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!