🕒 1 min read
मुंबई : यंदाचा आयपीएल हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सचा संघ प्रथमच स्पर्धेत प्रवेश करत आहे. मेगा लिलावात ७.५ कोटींची बोली लागलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर संघ बांगलादेशचा गोलंदाज तस्किन अहमदचा विचार करत होता, पण बांगलादेश बोर्डाने तस्किनला एनओसी (NOC) दिलेली नाही.
यावेळी आयपीएलमध्ये एकूण १० संघ उतरणार आहेत. एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून (बीसीबी) तस्किन अहमदला एनओसी मिळालेली नाही. बीसीबी क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष जलाल युनूस म्हणाले, “संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर मायदेशात भारताविरुद्ध मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिका आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत त्याने आयपीएलमध्ये भाग घेणे योग्य होणार नाही, असे आम्हाला वाटते.”
ते म्हणाले, ”आम्ही तस्किनशी बोललो असून त्याला संपूर्ण परिस्थितीची जाण आहे. आपण आयपीएलमध्ये खेळत नसल्याची माहिती त्याने फ्रेंचायझीला दिली आहे. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
