Share

विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ आता साता समुद्रापार पोचणार..

Published On: 

मुंबई : काश्मीर फाइल्सला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. विवेक अग्निहोत्री न्यूझीलंडमध्ये काश्मीर फाइल्स रिलीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. न्यूझीलंड वर्गीकरण कार्यालयानुसार, R16 प्रमाणपत्र अंतर्गत, 16 वर्षांखालील मुलांना प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीशिवाय चित्रपट पाहण्याची परवानगी दिली जाणार नाही.

विवेक अग्निहोत्री न्यूझीलंडमध्ये काश्मीर फाइल्स रिलीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.  यासाठी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एका याचिकेवर स्वाक्षरी करण्यासाठी अर्जही केला आहे.  विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की,’न्यूझीलंडमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ रिलीज करण्यासाठी आणि कट्टरपंथी गटांना शरण न जाण्यासाठी सरकारला याचिकेवर स्वाक्षरी करण्याची विनंती करत आहे. सध्या 20,439 स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत.  तुम्ही सही करू शकता का?’

विवेकच्या या ट्विटनंतर लोक त्याला खूप पाठिंबा देत आहेत आणि त्यासाठी त्याच्या प्रयत्नांना सलामही करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हो गया सर, चांगले काम.’  दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘तुम्हाला नक्की सपोर्ट करेल.’  दुसऱ्याने लिहिले, ‘ही आमची लढाई आहे, तुम्ही एकटे नाही आहात.’ अशा प्रकारे हजारो लोकांनी विवेकच्या याचिकेवर स्वाक्षरी केली.

माजी उपपंतप्रधानांनी विरोध केला

सेन्सॉर प्रमुखाच्या या निर्णयाला देशाचे माजी उपपंतप्रधान आणि न्यूझीलंड फर्स्ट या राजकीय पक्षाचे नेते विन्स्टन पीटर्स यांनी विरोध केला आहे.  विन्स्टनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर या निर्णयावर टीका करताना लिहिले की, ‘द काश्मीर फाइल्स’चे सेन्सॉरिंग हा न्यूझीलंडच्या स्वातंत्र्यावरील आणखी एक हल्ला आहे. त्यावर सेन्सॉर करणे म्हणजे १५ मार्च किंवा ९/११ च्या हल्ल्यातील अत्याचाराची माहिती आणि छायाचित्रे सेन्सॉर करण्यासारखे आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!