🕒 1 min read
मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत एक ठराव मांडला. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्यासंबंधी हा ठराव होता. त्याच भाजपच्या आमदारांनी कडाडून विरोध केला. यावेळी त्यांनी सभागृहात गदारोळ केला. या गदारोळावरुन भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले होते.
भाजप आमदारांकडून भास्कर जाधव यांच्या समोरचा माइक आणि राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले होते. पुन्हा सभागृह सुरु झाल्यानंतरही त्यांनी अध्यक्षांना शिवीगाळ केली. या वर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षाने निलंबनाचा ठराव आणला होता. निलंबित सदस्यांना पुढील वर्षभर मुंबई व नागपूर विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. या ठरावाविरोधात निलंबित आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
विधानसभा सभागृहात गोंधळ घालणे तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याशी गैरवर्तन करणे भाजपच्या 12 आमदारांना (12 BJP MLA) चांगलंच महागात पडलं आहे. जुलै महिन्यात या वर्तनामुळे भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन (Suspended MLA) करण्यात आले होते. या निलंबनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात या आमदारांना हजर राहता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होईल.
भाजपच्या ज्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती, त्यात संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांडडिया यांचा समावेश आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही आमदारांच्या याचिकेवर सुनावणी करत निलंबनाच्या स्थगितीला नकार दिला आहे. विधानसभेच्या ठरावाला अंतरिम स्थगिती देता येणार नाही, आमदारांनी यासंदर्भात अध्यक्षांकडेच विनंती करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही’ निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवाच; चंद्रकांत पाटलांचं मविआला ओपन चॅलेंज
- महाविकास आघाडी सरकारबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्यं
- ‘आजपर्यंतच्या इतिहासात असा दिवस कधीच पाहायला मिळाला नव्हता’
- ‘पंतप्रधानांनी औरंगजेबाचा उल्लेख करत ‘त्या’ शक्तींना योग्य तो संदेश दिला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
