औरंगाबाद: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात वातावरण तापले आहे. आपल्या पक्षाचा प्रचार करण्याची कुठलीच संधी राजकीय नेते सोडत नाहीयेत. आता आगामी निवडणुका लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आज राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. त्याच्या दौऱ्या आधीच मनसेमधील अनेक पदाधिकऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप पक्ष हे सरकार पडणार असल्याचे भाकीत नेहमीच करत आलं आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी तर महाविकास आघाडी सरकार मार्चमध्येच पडणार असल्याचे भाकीत केले होते. आता यावर राज ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडी सरकार बद्दल मोठं वक्तव्यं केलं आहे.
औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकार पडणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, तिघांचं सरकार पाहता हे सरकार पडेल असं वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच महाविकास आघाडीचे घोटाळे मी काढणार नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या:
- आता तैमूर आणि जेहदेखील क्वारंटाईन ; करीनाच्या वडिलांनी केला खुलासा
- ‘पंतप्रधानांनी औरंगजेबाचा उल्लेख करत ‘त्या’ शक्तींना योग्य तो संदेश दिला’
- औरंगाबाद मनसेत खळबळ; जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथेंना पदावरुन काढले..!
- ‘ही’ निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवाच; चंद्रकांत पाटलांचं मविआला ओपन चॅलेंज
- असा घोडेबाजार होणे हे…; नाना पटोलेंचा भाजपवर पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
