पुणे : महाराष्ट्रात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत 6 जागांपैकी 4 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. यावरुन भाजपने महाविकास आघाडीतील काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीला ओपन चॅलेन्ज दिले आहे. पुण्यात आज त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
निवडणुका बिनविरोध करू असा शब्द काँग्रेसने न पाळल्यामुळे झालेल्या निवडणुकात भाजपला मोठं यश मिळालं आहे. आम्ही महाविकास आघाडीची मत फोडली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. 3 टर्म आमदार असलेल्या बाजोरिया यांना हरवून खंडेलवाल मोठ्या फरकाने विजयी झाले. बावनकुळेंच्या बाबतीत साई बाबांचे वाक्य खरे ठरले श्रद्धा आणि सबुरीचे फळ मिळाले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
काँग्रेसने तर निवडणुकीचा पोरखेळ केला होता. आम्ही बिनविरोध करा म्हणत होतो. त्यांनी नागपूरमध्येही बाहेरून आणलेला माणूस त्यालाही फसवले आहे. आता महाविकास आघाडीला माझे खुले आव्हान आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवा. कायद्यात बदल करून रडीचा डाव खेळू नका, असे खुले आव्हानही चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने ‘मविआ’चा दारुण पराभव केला’
- ‘राज्य चालवण्याची क्षमता ‘मविआ’त नाही, हे या निवडणुकांवरुन दिसून आले’
- मी निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; फडणवीसांची प्रतिक्रिया
- कर्नाटकात मराठी भाषिक नेत्यावर शाई फेकल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया
- काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचं नेतृत्त्व काय करणार – प्रवीण दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
