नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनामध्ये झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या पहिल्याच दिवशी 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यावरुन राजकारणात मोठा वाद सुरु आहे. केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले जात आहेत. दिल्लीत भाजपविरोधात विरोधक एकवटल्याचे पाहायला मिळत आहेत.
निलंबनाविरोधात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन केले जात आहे. आज राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी संसदेबाहेर जमत मोदी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
2 आठवड्यांपासून हा संघर्ष सुरू आहे. हे फक्त 12 खासदारांचे निलंबन नाही. मी मानतो की शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आमच्या खासदारांचे हे सर्वात मोठे बलिदान आहे. सरकार ऐकायला तयार नाही. आज जेव्हा आम्ही सकाळपासून सदनात आंदोलन सुरू केले, तेव्हा आमची मागणी होती लोकशाही वाचवा आणि आम्हाला न्याय हवा. पण लोकशाही आणि न्याय हे शब्द सरकारला ऐकायचे नाहीत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
आम्ही चेअरमन साहेबांकडे मागणी केली की आम्हालाही निलंबित करा. तर त्यांनी सरकारकडे बघून सांगितलं की त्यांना सांगा तुम्हाला निलंबित करायला. याचा अर्थ अध्यक्षांचे अधिकार सरकारकडे आहेत. सरकारला वाटलं तर निलंबित करतील, सरकारला वाटलं तर निलंबन मागे घेतील. आजपर्यंतच्या इतिहासात लोकशाहीमध्ये असा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नव्हता, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही’ निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवाच; चंद्रकांत पाटलांचं मविआला ओपन चॅलेंज
- ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने ‘मविआ’चा दारुण पराभव केला’
- ‘राज्य चालवण्याची क्षमता ‘मविआ’त नाही, हे या निवडणुकांवरुन दिसून आले’
- मी निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद बावनकुळेंच्या विजयाने; फडणवीसांची प्रतिक्रिया
- कर्नाटकात मराठी भाषिक नेत्यावर शाई फेकल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया


