🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं लोकार्पण केले. यावेळी आपल्या भाषणात मोदींनी ‘या ठिकाणी औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराजदेखील विरोधात उभे ठाकतात’. असा उल्लेख केला होता. याशिवाय मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक भारतीय पराक्रमांचेही दाखले दिले. यावर आता भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, कालच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधानांनी औरंगजेबासारख्या अत्याचारी आक्रमकांसमोर प्रत्येक वेळी एखादे छत्रपती शिवाजी महाराज उभे रहातात असे सांगून आक्रमकांची भलामण करणाऱ्या शक्तींना योग्य तो संदेश दिला. असे भातखळकर म्हणाले.
कालच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉर लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधानांनी औरंगजेबासारख्या अत्याचारी आक्रमकांसमोर प्रत्येक वेळी एखादे छत्रपती शिवाजी महाराज उभे रहातात असे सांगून आक्रमकांची भलामण करणाऱ्या शक्तींना योग्य तो संदेश दिला. pic.twitter.com/wg7S678sK2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 14, 2021
आक्रमण करणाऱ्यांनी या नगरीवर हल्ले केले आणि उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. औरंगजेबाने केलेले अत्याचार त्याच्या दहशतीची साक्ष देतात. त्याने तलवारीच्या बळावर येथे बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या देशाच्या मातीत इतर जगापेक्षा काही वेगळं आहे. येथे औरंगजेब आला तर छत्रपती शिवाजी महाराजदेखील उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची ताकद दाखवून देतात.
इंग्रजांच्या काळात देखील काशीच्या लोकांनी हेस्टिंगचे काय हाल केले होते, हे येथील आपणाला माहिती आहे. असा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी केला. अनेक वर्षांच्या गुलामगिरीने आपल्यावर परिणाम केला होता, भारताला हीन भावनेने भरून टाकलं होतं. मात्र, आजचा भारत त्या हीन भावनेतून बाहेर पडत आहे.
आजचा भारत केवळ सोमनाथ मंदिराचं सौंदर्यीकरणच करत नाही, तर समुद्रात हजारो किलोमीटर ऑप्टिकल फायबर देखील पसरवत आहे. आजचा भारत केदारनाथचा जिर्णोद्धारच करत नाही, तर स्वतःच्या हिमतीवर अंतराळात भारतीयांना पाठवण्याच्या तयारीत आहे. आजचा भारत केवळ अयोध्येत प्रभू रामाचं मंदीरच बनवत नाही, तर देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज देखील बनवत आहे, असे यावेही नरेंद्र मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का
- ‘आघाडी करुन शिवसेनेने पायावर धोंडा मारुन घेतला, राष्ट्रवादी तर गनतीतच नाही’
- करीना कपूर पॉझिटिव्ह होताच बीएमसीने घर केले सील
- ‘सेनेचा बाण भरकटला, घड्याळाचं टाईमिंग चुकलं आणि जनतेनं काँग्रेसची साथ सोडली’
- विजयाचे आनंदाश्रू! बावनकुळेंची फडणवीसांना मिठी, दोघेही गहिवरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
