मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
यासंदर्भात आज (२७ मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना नाना पटोले म्हणाले की,‘केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यानंतर २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तद्पश्चात ७ एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान, माजी मंत्री अनिस अहमद, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष एम एम शेख उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- “अजित पवारांमध्ये धमक असून ते प्रेमाने…”, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
- “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात..”, अजित पवारांचा दत्तात्रेय भरणे यांना टोला
- IPL 2022 : काय सुरुवात केलीय..! रोहितनं आपल्या दोस्तालाच ठोकला यावर्षीचा पहिला षटकार; पाहा VIDEO
- IPL 2022: डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात RCBचा संघ PBKS ला भिडणार ; वाचा असा असू शकतो संभाव्य संघ
- “मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसींवर अन्याय नको”- विजय वडेट्टीवार


