मुंबई: आयपीएल २०२२ च्या डबल हेडरचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली यांच्यात होणार आहे. सामन्यातील नाणेफेक जिंकत कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरेल. दोन्ही संघांकडून अनेक खेळाडूंना पदार्पणाच्या कॅप्स मिळाल्या आहेत.
IPL 2022 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (csk vs kkr) यांच्यातील सामन्याने झाली आहे. आता स्पर्धेतील दुसरा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर DC vs MI यांच्यात होणार आहे. हा सामना या मोसमातील पहिला डबल हेडर असेल. दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कमलेश नागरकोटी, टीम सेफर्ट, रोवमन पॉवेल, कुलदीप यादव दिल्लीकडून या सामन्यात पदार्पण करत आहेत. दुसरीकडे टिळक वर्मा, टीम डेव्हिड, एम अश्विन, रिले मेरेडिथ आणि टायमल मिल्स यांना मुंबईसाठी पदार्पण कॅप मिळाली आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन :
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (c ), इशान किशन (wk), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, टीम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (w/c), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी
महत्वाच्या बातम्या
- पुढील काळात पोलीस दलालाही ई-वाहनं देण्याचा प्रयत्न- अजित पवार
- Women’s WC 2022: टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न पराभवाने भंगले, आफ्रिकेचा ३ विकेट्सने विजय
- मला मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली पाहायची आहे- चंद्रकांत पाटील
- “संजय राऊतांकडून माझी चेष्टा केली जाते पण हीच चेष्टा त्यांच्या…”, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- IPL 2022: ‘पिवळी जर्सी घालून थेट स्टेडियममध्ये जावं असं वाटतं होत’, सुरेश रैनाचे वक्तव्य व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

