मुंबई : पंजाब किंग्ज या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध आज म्हणजेच २७ मार्च रोजी DY पाटील स्टेडियमवर खेळणार आहे. यंदा संघासाठी प्रत्येक सामना आव्हानात्मक असणार आहे. कारण आता मयंक अग्रवालकडे संघाची धुरा असून ही जबाबदारी त्याच्यासाठी नवीन आहे. यावेळी संघातील खेळाडूंमध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत. पण, ऑक्शननंतर फ्रँचायझी बऱ्यापैकी संतुलित दिसत आहे. तथापि, फाफ डू प्लेसिसविरुद्ध प्लेइंग इलेव्हनच्या निवडीत पंजाब किंग्जचे आव्हान असू शकते.
तसेच आरसीबीबाबत (RCB) सांगायचे झाले तर विराटनंतर फाफ डु प्लेसिसकडे कर्णधारपद गेले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असलेला फाफ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये नेतृत्व करताना दिसणार आहे. गेल्या वर्षी विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर कर्णधार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. सुदैवाने चेन्नईने फाफला रिटेन न केल्याने आरसीबीने त्याला खरेदी केले आणि आता बंगलोरला नवा कर्णधार मिळाला आहे. दोन नवीन कर्णधारांमधील ही लढत चुरशीची ठरू शकते.
संभाव्य संघ:
PBKS: मयंक अग्रवाल (c, शिखर धवन, प्रभसिमरन सिंग/जितेश शर्मा (wk), लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, भानुका राजपक्षे, ओडियन स्मिथ, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, राहुल चहर, संदीप शर्मा.
RCB: फाफ डू प्लेसिस (c), अनुज रावत, विराट कोहली, महिपाल लोमरोर, शेरफेन रदरफोर्ड, दिनेश कार्तिक (wk ), वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकारच्या ‘या’ निर्णयाचे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले कौतुक
- “…ते आता खरं ठरतंय”, यशवंत जाधवांवरील कारवाई संदर्भात देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- “शिवसेना पोलीस स्टेशन असा बोर्ड लावा”; किरीट सोमय्या संतप्त
- ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही- आदित्य ठाकरे
- “अजून खूप माहिती बाहेर येणे बाकी”, यशवंत जाधवांवरील कारवाईवर सोमय्यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

