🕒 1 min read
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीमध्ये बोलत असताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना चांगलाच टोला लगावला.निधी वाटपावरून केलेल्या विधानावरुन दत्तात्रेय भरणेंना त्यांनी आपल्या पदाची आठवण करुन दिली. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नुतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
“सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे यांच्या विभागातून इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक निधी दिला जात आहे. आम्हालाच मामांना विनंती करावी लागते की, बारामतीला देखील काही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्यांना माहीत नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत”, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर एकच हशा पिकला.
तसेच मी तिजोरी उघडली आणि बांधकामाला पैसे दिले तरच ते देणार असेही अजित पवार म्हणाले. यावर आता गाडी घसरायला लागलीये त्यामुळे थांबतो. असे म्हणत त्यांनी आपले
महत्वाच्या बातम्या
- “अजित पवारांमध्ये धमक असून ते प्रेमाने…”, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022: डबल हेडरच्या पहिल्या सामन्यातील टॉस दिल्लीने जिंकला ; मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण!
- पुढील काळात पोलीस दलालाही ई-वाहनं देण्याचा प्रयत्न- अजित पवार
- Women’s WC 2022: टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न पराभवाने भंगले, आफ्रिकेचा ३ विकेट्सने विजय
- मला मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली पाहायची आहे- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
