मुंबई: IPL 2022 ला धमाकेदार सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स वानखेडे स्टेडियमवर १५ व्या हंगामातील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आले. ज्यात कोलकाताने चेन्नईचा धुव्वा उडवला. दरम्यान, यंदाही उद्घाटन सोहळा झाला नाही. आयपीएलचा उद्घाटन सोहळा न होण्याचे हे चौथे वर्ष आहे. मात्र यावेळी या सोहळ्याऐवजी क्रीडा जगतातील बड्या व्यक्तींचा भारतीय क्रिकेट बोर्डाकडून सन्मान करण्यात आला आहे.
IPL 2022 चा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. पण चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यापूर्वी, गेल्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या भारतीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ज्यात टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला (neeraj chopra) १ कोटी रुपयांची रक्कम देऊन सन्मानित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेटने घेतला.
नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. नीरजसोबतच लव्हलिना बोरगोहेन यांचा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच पुरुष हॉकीचा कर्णधार मनप्रीत सिंगचा देखील सन्मान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- “मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसींवर अन्याय नको”- विजय वडेट्टीवार
- IPL 2022: डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात RCBचा संघ PBKS ला भिडणार ; वाचा असा असू शकतो संभाव्य संघ
- केजरीवाल सरकारच्या ‘या’ निर्णयाचे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले कौतुक
- “…ते आता खरं ठरतंय”, यशवंत जाधवांवरील कारवाई संदर्भात देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- “शिवसेना पोलीस स्टेशन असा बोर्ड लावा”; किरीट सोमय्या संतप्त


