🕒 1 min read
मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर आज मुंबई इंडियन्स आपला यंदाच्या हंगामातील पहिला सामना दिल्लीविरुद्ध खेळत आहे, या सामन्यात दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईकडून रोहित शर्मा आणि इशान किशनने दमदार सुरुवात केली. पहिल्या ६ षटकामध्ये दोघानी मुंबईसाठी ५३ धावा ठोकल्या. कप्तान रोहित शर्माने मुंबईसाठी पहिला षटकार आणि पहिला चौकार ठोकला.
मुंबईकर खेळाडू पण सध्या दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य असलेल्या शार्दुल ठाकूरने पहिले षटक टाकले. यावेळी रोहितने त्याला पहिल्याच षटकात एक चौकार आणि सुंदर षटकार खेचला. रोहितच्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितने या सामन्यात ४ चौकार आणि २ षटकारांसह ४१ धावा केल्या. फिरकीपटू कुलदीप यादवने त्याला माघारी धाडले.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन:
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, टिम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022: ‘धोनी जडेजासारखी फलंदाजी करत होता आणि…’ ; सेहवागने घेतली चेन्नईच्या खेळाडूंची फिरकी
- “यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’ कोण?”- अतुल भातखळकर
- “अजित पवारांमध्ये धमक असून ते प्रेमाने…”, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022: डबल हेडरच्या पहिल्या सामन्यातील टॉस दिल्लीने जिंकला ; मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण!
- पुढील काळात पोलीस दलालाही ई-वाहनं देण्याचा प्रयत्न- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
