Share

मी पदासाठी कोणतेही काम करत नाही – सुप्रिया सुळे

Published On: 

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत. त्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली.

जोरगेवार यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण 2024 ची निवडणूक बारामती येथून लढवणार असल्याचे स्पष्ट कले. तसेच मुख्यमंत्री पदासाठी आपण इच्छुक नसूव पदासाठी मी कोणतेही काम करत नाही, असे देखील सुळे यांनी म्हटले.

आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्री विकासकामांसाठी टक्केवारी मागतात, असा आरोप केलाय. त्यावर प्रतिक्रिया देताना हे गंभीर असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या भेटीनंतर सुळे यांनी समाधान व्यक्त केले. कर्तृत्ववान महिलेच्या पोटी आलेल्या कर्तृत्ववान मुलाचे काम पाहताना अभिमान वाटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या कौटुंबिक भेटीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी जोरगेवार यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा निवडणुकीत मविआ बॅकफूटवर असल्याची स्थिती असताना सुप्रिया सुळे यांनी आमदार जोरगेवार यांच्यासाठी कुठला संदेश आणलाय, याची आता जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!