Share

“शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे” ; रामदास आठवलेंचा निर्धार

Published On: 

🕒 1 min read

नवी मुंबई : केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नवी मुंबई येथे पत्रकारांनशी संवाद साधला. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत त्यांनी यावेळी भाष्य केले. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आरपीआयला ३५ ते ३६ जागा मिळाल्या पाहिजे. आम्ही १८ ते २० जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करू, असे रामदास आठवले म्हणाले.

मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुंबईच्या विकासाकडे शिवसेनेनेन आजपर्यंत दुर्लक्ष केलेले आहे. प्रत्येकवेळी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई करण्याचाच प्रयत्न शिवसेनेकडून झाला आहे. म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं आवश्यक आहे.

“शिवसेना नेते यशवंत जाधव यांना चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष पद दिले. मात्र ते बौद्ध असल्यामुळे त्यांना मुंबईच्या महापौर पदाची संधी दिली नाही. यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार आहेत, मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलेले नाही. बौद्ध समाजाला डावलण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून वारंवार झाला आहे. सध्या यशवंत जाधव यांची चौकशी सुरू आहे, त्यांनी त्यांची बाजू मांडली. मात्र यशवंत जाधवांची बाजू शिवसेना घ्यायला तयार नाही. अनिल परब यांना पाठिंबा दिला जातो पण यशवंत जाधव यांना पाठिंबा दिला जात नाही. बौद्ध समाजावर अन्याय करण्याची ही भूमिका शिवसेनेची आहे. शिवशक्ती – भीमशक्ती बाळासाहेबांच्या प्रयोगाला मूठमाती देण्याचं काम शिवसेनेने केले आहे,” असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

“राज्यसभेची सहावी जागा ही भाजपची निवडून आली पाहिजे. आमच्याकडे ३२ मते आहेत केवळ १० मतांची आम्हाला आवश्यकता आहे. त्यामुळे सहावी जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीने दिलेला प्रस्ताव फेटाळल्याने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो,” असे रामदास आठवले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!