Supriya Sule | मुंबई : महाराष्ट्रातील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि भाजप (BJP) प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून राज्य सरकारवर टीका सुरू आहे.
यादरम्यान, दोन्ही छत्रपतींनी भूमिका घेतलेली आहे. संजय राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी सगळ्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याचं मी स्वागत करते. ज्या पद्धतीने सातत्याने भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष जी पाठराखण अशा लोकांची करताय, त्याचा मी जाहीर निषेध करत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच, मला असं वाटतं राजकारण कधीतरी ठेवून स्वत:चा स्वाभिमानासाठी आणि ज्या छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. जो आपला श्वास आहे, ध्यास आहे आपला आदर आहे, ओळख आहे. त्यांच्या मानसन्मासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी राज ठाकरेंचंही भाषण ऐकलं. याचंही मी स्वागत करते, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपण सगळ्यांनी लढण्याची गरज आहे, असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जी घसरते आहे, त्याबद्दल सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी अनेकदा आमच्या विरोधकांनाही विनंती केली आहे, की आपण सगळे एकत्र मिळून महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे जी अनेक दशकं आपल्या ज्येष्ठांनी जपलेली आहे. ती कुठेतरी ढासळताना दिसते आहे, सुसंस्कृत पणा जो आधी होता तो परत आणण्याचा प्रयत्न करूयात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याच्या चर्चेवर संजय राऊत म्हणतात, “राजभवनाची खिंड…”
- Rupali Chakankar | “भारतमाता विधवा की सधवा ठरवणारे तुम्ही कोण?”; रुपाली चाकणकर यांचा संभाजी भिडेंना खोचक सवाल
- Bhagatsingh Koshyari | “मलाच महाराष्ट्राचं राज्यपाल पद नकोय”, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वक्तव्य
- Jitendra Awhad | “माविआला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यावीच लागेल”; राज्यापालांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक
- Ajit Pawar | “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की…”, अजित पवारांचा गौप्यस्फोट


