Share

“भाजपच्या मोकाट प्रवक्त्यांनी पंतप्रधानांचे फोटो वाईट पद्धतीने..” रोहित पवारांची खंत

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्लीचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इस्लाम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी केल्याने एकूणच मुस्लिम समूहामध्ये तीव्र असंतोषाची लाट आहे. या सर्वाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळत आहे. भाजपने आता नुपूर शर्मा यांना निलंबित केले असून जिंदाल यांना बडतर्फ करण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन भाजपला लक्ष्य केले आहे.

रोहित पवार म्हणतात, “राजकीय विरोधक असले तरी नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळी भाजपच्या मोकाट प्रवक्त्यांनी आणलीय. तसचं आखातातील भारतीयांची अडचण होत असून भारतीय मालावर बहिष्कार टाकला जातोय. हा देशाचा अवमान असून यामुळं प्रत्येक भारतीय संतप्त आहे,” अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपकडून देशाचा अवमान होत असल्याबद्दल टीका केली आहे.

“विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत. किंबहुना त्यांच्या या ‘लाय…’ मुळंच राज्यातील भाजपने त्यांची भरती केलीय. देशाची मान खाली घालायला लावणाऱ्या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी,” असे म्हणत त्यांना नाव न घेताच अप्रत्यक्षपणे भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनाही टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!