मुंबई : काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्येचं सत्र वाढत चाललं आहे. बँक कर्मचाऱ्याची हत्या आणि आता २० पोलीसांच्या हत्या अशा टार्गेट किलिंगच्या अनेक घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजपवर निशाना साधला. “भाजपचे नेते माशिदींखाली शिवलिंग शोधत आहेत, त्यांना काश्मीरमधील हिंदूंचा आक्रोश ऐकू येत नाही”. अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
काश्मिरी पंडितांच्या पालायानावर आता “काश्मीर फाइल्स २” असा चित्रपट काढावा, अशी खोचक टीका देखील राऊतांनी केली होती. याला प्रत्युत्तर देत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक टवीट केलयं. “राज्यात आत्महत्या केलेल्या १५० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकू आला नाही आणि काश्मीर मधल्या हिंदूंचा आक्रोश ऐकू येतोय, यांचे कान कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण असावेत”, असा खोचक टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला.
भाजपचे नेते मशिदींखाली शिवलिंग शोधतायत त्यांना काश्मीरमधील हिंदूंचा आक्रोश ऐकू येत नाही इति सर्वज्ञानी
राज्यात आत्महत्या केलेल्या १५०च्यावर
ST कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश ऐकू आला नाही आणि काश्मीर मधल्या हिंदूंचा आक्रोश ऐकू येतोययांचे कान कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण असावेत pic.twitter.com/KFZtoXpQpW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 6, 2022
प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याचं काम भाजपने थांबवावं असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल होतं. त्यांच्या या वक्तव्याला समर्थन देतो असं सांगत राऊतांनी भाजपला “शिवलिंग शोधत बसण्यापेक्षा काश्मिरी पंडितांची हत्या थांबवावी” असा सल्ला दिला होता. त्यांच्या या विधानानंतर हा वाद अजूनच पेटलेला पाहायला मिळतोय.
“भाजपचे नेते माशिदींखाली शिवलिंग शोधतायत त्यांना काश्मीरमधील हिंदूंचा आक्रोश ऐकू येत का नाही? इति सर्वज्ञानी राज्यात आत्याहत्या केलेल्या १५० च्यावर ST कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकू आला नाही आणि काश्मीर मधल्या हिंदूंचा आक्रोश ऐकू येतोय, यांचे कान कुत्र्यापेक्षा तीक्ष्ण असावेत”. अशा आशयाचं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

