Share

Supriya Sule | चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” गृहमंत्र्यांचा कायदा…”

Published On: 

🕒 1 min read

Supriya Sule | मुंबई : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून .मनोज गरबडे, विजय ओव्हाळ, धनंजय इजगज तिघांना अटक केली आहे. दरम्यान पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.

शाईफेक करणाऱ्या ( Throwing ink) तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी  (Police Custody) सुनावली आहे. शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत.  यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला वाटतं, गृहमंत्र्यांचा कायदा हा नियमाप्रमाणे चालत नाही, तो त्यांच्या मर्जीप्रमाणे चालतो. ते अभिमानाने सांगतात, आमचं ‘ईडी’ सरकार आहे. कुणीही त्यांच्या विरोधात बोललं तर त्याच्या पाठीमागे तपास यंत्रणांची चौकशी लावली जाते.”

“देशातील राजकीय नेत्यांवरील एकूण गुन्ह्यांपैकी जवळपास ९५ टक्के गुन्हे हे विरोधी पक्षातील नेत्यांवर दाखल कले आहेत. त्यांच्या पक्षातील एखाद्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला, तर त्याला वाॉशिंग मशीनमध्ये घातल्याप्रमाणे साफ करून ‘क्लीन चीट’ दिली जाते, हे संपूर्ण देशानं पाहिलं आहे. याबाबतचा तपशीलही समोर आला आहे. मी कुठलेही वैयक्तिक आरोप करत नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!