🕒 1 min read
मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार असा इशारा दिला होता. या हनुमान चालीसा प्रकरणावेळी पोलीस जेव्हा राणा दाम्पत्याच्या घरी गेले होते तेव्हा त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. यावेळी ते आम्ही खासदार आमदार आहोत तुम्ही आम्हाला असं थांबवू शकत नाही, असे म्हणाले होते. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा प्रकरणी अटक देखील करण्यात आली होती. आता पुन्हा या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. येत्या ८ जून रोजी वांद्रे न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. ८ जूनला राणा दाम्पत्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार असल्याचीही माहिती आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. या पाश्वर्भूमीवर राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला पुण्यातील सभेत जोरदार टोला लगावला होता. राज ठाकरे म्हणाले, “गुजरातमध्ये कुणाला माफी मागायला लावणार आहात? हे अचानक आत्ता कसं सुरू झालं? ज्यांना आपलं हिंदुत्व, लाऊडस्पीकर झोंबले, आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात. मी म्हटलं जर मशिदीवर बांग जोरात लागली तर त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावा. हे राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणायला गेले. ती काय मशीद आहे का? तिथं हनुमान चालिसा म्हणायला. मग त्यांना अटक केली. मधू इथे आणि चंद्र तिथे असं झालं”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
