Share

अनिल देशमुख आणि नवाब मलिकांवर अन्याय – सुप्रिया सुळे

Published On: 

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद्र इब्राहिम याच्याशी संबंधित पैशांच्या अफरातफरच्या आरोपांप्रकरणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तर अटक केली होती. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून या कारवाईचा नेहमी निषेध करण्यात येतो. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक आणि अनिल देशमुखांची पाठराखन केली आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी काहीही केल नसताना त्यांना अटक केली. या दोन्ही नेत्यांवर अन्याय करण्यात आला, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आमचा कोर्टावर विश्वास असून आज नाहीतर उद्या त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला. तसेत राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना मतदानाची संधी द्यावी, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) २ मे ला (गुरुवार) मुंबईतील विशेष न्यायालयात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या 100 कोटींच्या लाचखोरीच्या आरोपांच्या तपासासंदर्भात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोपपत्र दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच आरोपपत्र दाखल करण्याच्या एका दिवसापूर्वी मुंबईतील विशेष न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा सरकारी साक्षीदार होण्यासाठी केलेला अर्ज स्वीकारला होता.

तसेच मुंबई अंडरवर्ल्ड, फरारी डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिकला अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. मलिक यांनी वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांचा तात्पुरता जामीन मागितला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!