जळगाव : मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली असताना दुसरीकडे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबद मोठे विधान केले आहे.
गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.