नवी मुंबई : पर्यावरणदिनी झाडे वाचवण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांच्या नेतृत्वात ऐरोली ते वाशी अरेंजा कॉर्नपर्यंत लाँग मार्च काढला होता. भाजप आमदार गणेश नाईक यांनी काल लॉंग मार्च काढत चिपको आंदोलन केले. आता गणेश नाईक यांच्या आंदोलनावर ठाण्यातील शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी सडकून टीका केली आहे.
“ज्यांनी पंचवीस वर्ष फक्त भ्रष्टाचार केले, जे नागा सारखे सत्तेवर बसले होते आणि त्यांच्यात सत्तेत जो ठराव झाला त्या निर्णयाला आज ते विरोध करत आहेत. तोडपाण्याचे काम कोण करत आहे? हे नवी मुंबई शहराला माहीत आहे. लवकरच मी पण पुरव्यासह पत्रकार परिषद घेऊन याचे कारस्थान उघड करणार”, असे शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –


