मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. भारतात कोरोना संसर्गात पुन्हा एकदा लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४५१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात एकुण अॅक्टिव्ह रुग्णांची संध्या २५७८२ इतकी आहे. तर मागील २४ तासांत २७७९ जणांची प्रकृती बरी झाली आहे. आत्तापर्यंत ४२६३०८५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सरकारी आकड्यांनुसार आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे ५२४७०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण, ४३१८१३३५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे.
आता देशात कोरोनाची चौथी लाट येण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. दिल्लीत रविवारी १.९१ टक्के पॉझिटिव्ह दरासह ३४३ नवीन कोरोना प्रकरणं नोंदवली गेली आहेत. कर्नाटकात रविवारी ३०१ नवीन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १ हजार ४९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी ६१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ३८ हजार ५६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ % एवढे झाले आहे.
राज्यात आज १४९४ नवीन रुग्णांचे निदान झालेय. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार ७६७ इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

