मुंबई : लाल मातीचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणार्या स्पेनच्या राफेल नदालने रविवारी नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून १४वे फ्रेंच ओपन (French Open 2022) विजेतेपद पटकावले. पॅरिसमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने रुडेचा ६-३, ६-३, ६-० असा पराभव करून विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. यासह फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावणारा नदाल जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
नदालने वयाच्या ३६ वर्षे २ दिवसात हे विजेतेपद मिळवले आहे. योगायोगाने, त्याने १७ वर्षांपूर्वी रोलँड गॅरोस येथे पहिले विजेतेपद जिंकले होते. या सामन्यात जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या नदालने कॅस्पर रुडविरुद्ध प्रथम सर्व्हिस करण्याचा निर्णय घेतला.
It never gets old ????#RolandGarros | @RafaelNadal pic.twitter.com/QrMdgRSq06
— Roland-Garros (@rolandgarros) June 5, 2022
King of Clay x 14 ????@RafaelNadal remains undefeated in Paris finals, conquering Casper Ruud 6-3, 6-3, 6-0 for a 14th title#RolandGarros pic.twitter.com/GctcC17Ah8
— Roland-Garros (@rolandgarros) June 5, 2022
राफेल नदाल हा २२ ग्रँडस्लॅमसह जगातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकणारा खेळाडू आहे. ज्यामध्ये १४ फ्रेंच ओपन, २ ऑस्ट्रेलिया ओपन, २ विम्बल्डन आणि ४ अमेरिका ओपनचा समावेश आहे. त्यांच्या खालोखाल स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांनी प्रत्येकी २० विजेतेपदे पटकावली आहेत. फेडरर जवळपास वर्षभर गुडघ्याच्या ऑपरेशननंतरही मैदानात परतू शकलेला नाही. तर जोकोविचला कोविड-१९ विरुद्ध लसीकरण न केल्यामुळे जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनला मुकावे लागले. रोलँड गॅरोसच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालने जोकोविचचा पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

