मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कोठडीत मुक्कामी असणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजायची मशीन सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवं वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या कोठडी मुक्कामाची सुरूवात मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापासून झाली. शरद पवार यांच्या घराबाहेर गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलन भडकावल्याचा आरोप करत मुंबईत सुरूवातील गुन्हा दाखल झाला. मुंबईत पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढल्यावर गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांच्या कोठडीत जावं लागलं. त्यानंतर त्यांनी सातारा पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढले. मात्र आता ही पैसे मोजायची मशीन सापडल्याने राज्यात सध्या पुन्हा खळबळ माजली आहे. गुणरत्न सदावर्ते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यात कोठडीत मुक्कामी आहेत.
कर्मचाऱ्यांच्या पैशातून मालमत्ता घेतल्याचाही आरोप
एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून गुणरत्न सदावर्ते यांनी मालमत्ता घेतली असा आरोपही करण्यात आलेला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत हे कोर्टात सध्या सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. तर सदावर्तेकडून अनेक वकीलांनी युक्तीवाद केला आहे. पोलीस तपासात सहकार्य नाही. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. सदावर्ते हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीत. ते त्यांचा मोबाईलही देत नाही, असेही प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –


