Share

IND vs SA 2022 : दक्षिण आफ्रिकेच्या संघातून वाईट बातमी, ‘या’ खेळाडूचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघाचे फलंदाज प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची सलामी दिली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या कॅम्पमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. संघातील एका महत्त्वाच्या खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नाणेफेक दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सांगितले की, ‘एडन मार्कराम कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे तो मालिकेबाहेर पडला आहे.’ या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) कोरोना नियम माफ केले आहेत. खेळाडूंसाठी बायो बबल तयार केलेला नाही. मात्र, सामन्यापूर्वी खेळाडूंची कोरोना चाचणी नक्कीच केली जात आहे. अशा स्थितीत पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी केलेल्या चाचणीत मार्करामचा अहवाल पॉझिटिव्ह आला असावा.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेंबा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे.

भारताची प्लेइंग इलेव्हन
भारत – इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!