मुंबई : दक्षिण आफ्रिका संघ ५ सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौर्यावर आलेला आहे. आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पहिला टी ट्वेंटी सामना खेळला जाणार आहे. सामन्यात सुरूवातीला नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार बवुमाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आता रिषभ पंतकडे सोपवण्यात आली आहे. रिषभ पंत अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद निभावणारा आठवा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर हा सामना रिषभ पंतचे घरेलू मैदान म्हणजे दिल्लीत खेळला जाणार असल्याने त्याला चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळेल.
या मालिकेत भारतीय संघ बऱ्याच नवीन चेहऱ्यांसोबत मैदानात उतरणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे आज होणाऱ्या पहिल्या सामन्याकडे उत्सुकतेने लक्ष लागलेले आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघात यांच्या पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरताना दिसेल.
South Africa have won the toss and elect to bowl first against #TeamIndia
Live – https://t.co/lJK64Efzvg #INDvSA @Paytm pic.twitter.com/etrIPIa0Rv
— BCCI (@BCCI) June 9, 2022
A look at the Playing XI for #INDvSA
Live – https://t.co/YOoyTQmu1p #INDvSA @Paytm pic.twitter.com/YiAjMS6VXK
— BCCI (@BCCI) June 9, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, डब्लू पार्नेल, टी स्टब्स ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरीक नॉर्किया, तबरेझ शम्सी.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

