🕒 1 min read
मुंबई : दिनेश कार्तिक भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसेल अशी आशा आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर कार्तिकने भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत हे पुनरागमन त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी खूप खास आहे. कार्तिकने आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसाठी फिनिशर म्हणून ३०३० धावा केल्या होत्या. यादरम्यान तो १० वेळा नाबाद राहिला आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे निवडकर्त्यांनी आत्मविश्वास दाखवत त्याला पुन्हा एकदा संधी दिली आहे.
आजच्या सामन्यावेळी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर कार्तिकला कसे वाटेल हे स्पष्ट करताना, माजी खेळाडू वसीम जाफरने करण-अर्जुन चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये शाहरुख खान म्हणत आहे की, ‘ मी हे ठिकाण आधी पाहिले आहे असे दिसते. मी या ठिकाणी काम केले आहे.’ तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल की २००८ च्या इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या मालिका विजयात वसिम जाफर आणि दिनेश कार्तिक यांनी सलामी जोडी म्हणून चांगले योगदान दिले होते.
.@DineshKarthik returning to the Indian dressing room tonight ???? #INDvSA pic.twitter.com/HsOFdi164F
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) June 9, 2022
राहुल द्रविडचे दिनेश कार्तिकबद्दलचे वक्तव्य
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिनेश कार्तिककडून आयपीएल सारखी चांगली कामगिरी करण्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,”दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने मोठा प्रभाव पाडला आहे. फिनिशरच्या स्थानावर फलंदाजीसाठी त्याची भारतीय संघातही निवड झाली आहे. आता तो भारतासाठी अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करू शकतो की नाही हे पाहायचे आहे.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
