Share

“उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बारावी थप्पड मारली” ; किरिट सोमय्यांची टीका

Published On: 

मुंबई : नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाकडून झटका बसला आहे. 10 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी एक दिवसाचा जामीन मागणाऱ्या दोन्ही नेत्यांची याचिका मुंबईतील न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने बुधवारी जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीदरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देशमुख आणि मलिक यांच्या याचिकांना विरोध केला आणि म्हटले की, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही. दरम्यान, या प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या गालावर न्यायालयाने बारावी थप्पड मारली. माफिया सरकारच्या माफिया सरदारला अस वाटते की गुंडांसारख राज करायचं. पण हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत मान्य नाही. उद्धव ठाकरे यांनी दाऊदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवले. मात्र आता त्यांना न्यायालय अशाच पद्धतीने धडे शिकवणार आहे.”

हायकोर्टात जाण्याच्या मुद्द्यावर किरीट सोमय्या म्हणाले, “त्यांना जाऊद्या तिथे जाऊद्या, ठाकरेंना थप्पडच खायची आहे. संजय राऊतच्या देखील कोर्टोने जोरात कानाखाली वाजवली.”

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देशमुख आणि मलिक हे दोघेही मनी लाँड्रिंगच्या वेगवेगळ्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. दोघांनीही गेल्या आठवड्यात विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांच्यासमोर तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी या जामीन अर्जाच्या बाजूने आणि विरोधात सर्व पक्षकारांनी युक्तिवाद पूर्ण केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!