टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस कार्यकारिणीची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांच्याकडे कॉंग्रेस नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा एकदा गांधी घराण्यातचं गेलेले पाहायला मिळत आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घोषणा करण्यात आली.
शनिवारी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत ही अध्यक्षपदाची घोषणा झाली. यावेळी बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ‘काँग्रसच्या नेत्यांनी राहुल गांधींना आपला राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र, राहुल गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसची सर्वसाधारण निवडणूक होऊन अध्यक्षांची निवड होऊपर्यंत सोनिया गांधींना अंतरिम अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली अशी माहिती दिली.
तसेच पुढे बोलताना सुरजेवाला यांनी काँग्रेसच्या या बैठकीत काश्मीरच्या मुद्द्यावर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी काश्मीरची स्थिती नाजूक असल्याचे मत समोर आले. तसेच तेथील स्थितीची माहिती किंवा बातम्या बाहेर येत नसल्याबद्दल काळजी व्यक्त करण्यात आली. तसेच काश्मीरला सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर युवा नेत्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. त्यात राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मध्यप्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव आघाडीवर होते. परंतु सोनिया गांधी यांच्या निवडीमुळे त्यांच्या नावांच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
- ‘कोल्हापूर – सांगलीतं आलेल्या महापुरामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात’
- पावसाची शक्यता वर्तवण्याइतके आपलं विज्ञान प्रगत नाही : देवेंद्र फडणवीस
- अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यावर सोनिया गांधी नाराज, भर सभागृहात टाकला नाराजीचा कटाक्ष
- आता पाक लष्कराला भारतावर हल्ल्याचा आदेश देऊ का ? – इम्रान खान भंजाळला


