Share

पावसाची शक्यता वर्तवण्याइतके आपलं विज्ञान प्रगत नाही : देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे संसार उध्वस्त झालेले आहेत. या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सरकार पुरेपूर प्रयत्न करत आहे.

याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना फडणवीस यांनी निर्सगाच्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही असे सांगितले. आपल्याकडे पाऊस नेमका किती मिलीमीटर पडणार हे आपल्याला समजू शकत नाही, तांत्रिकदृष्ट्या पावसाचं प्रमाण सांगितलं जातं. कोल्हापूर आणि सांगलीतील पावसामुळे गेल्या १०० वर्षातील पावसाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. त्यामुळे नेमका पाऊस किती पडणार हे सांगण्या इतपत आपलं विज्ञान प्रगत नाही असं फडणवीस यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना पूरग्रस्तांना पुरेल एवढा गहू आणि तांदळाचा साठा राज्य सरकारकडे उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता पुराचा फटका बसलेल्या गावांच्या पू्र्नविकासासाठी मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सरकारला मदत करा तसेच सिद्धीविनायक, शिर्डी, पंढरपूर, अंबाबाई, आर्ट ऑफ लिव्हिंग यासारख्या अनेक देवस्थानांकडूनही पूरग्रस्तांना मदत होत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!