Share

अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यावर सोनिया गांधी नाराज, भर सभागृहात टाकला नाराजीचा कटाक्ष

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाला आहे. तर आज गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर बोलाताना कॉंग्रेस नेते खा. अधीर रंजन चौधरी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तर चौधरी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची चांगलीचं अडचण झाली आहे.

काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा नाही. हा एक द्विपक्षीय मुद्दा असून संयुक्त राष्ट्र यावर 1948 पासून देखरेख ठेवून आहे, अस वादग्रस्त विधान चौधरी यांनी केले. या विधानानंतर सभागृहात एकचं गोंधळ उडला. तर भाजप नेत्यांनी चौधरी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. विशेष म्हणजे अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यावर माजी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. तर त्यांनी सभागृहात अधीर रंजन यांच्याकडे कटाक्ष टाकत नाराजी व्यक्त केली आहे.

अधीर रंजन यांच्या या सेल्फगोलमुळे काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी होऊ लागली. त्यानंतर सोनिया गांधींनी फक्त मनीष तिवारी यांनी पक्षाची भूमिका योग्य तऱ्हेने मांडली आहे, असं म्हणाल्या. तर अधिरंजन चौधरी यांचा उल्लेखही टाळला. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी अधीर रंजन यांच्यावर खूपच नाराज झाल्या. त्यांनी अधीर रंजन यांची वेगळी भेट घेऊन त्यांना समजही दिली.

पश्चिम बंगालचे विभाजन करून, दार्जिलिंग केंद्रशासीत प्रदेश करा : राजू बिस्ता

जम्मू काश्मीर पुर्नरचना विधेयकाचं आम्ही समर्थन करत नाही, ममता बॅनर्जींचा मतदानाला बहिष्कार

युती करताना मंत्रिपदांची नाही, तर कलम ३७० आणि राम मंदिराची अट घातली – संजय राऊत

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!