Share

युती करताना मंत्रिपदांची नाही, तर कलम ३७० आणि राम मंदिराची अट घातली – संजय राऊत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: देशहितासाठी सरकारकडून घेतले जाणाऱ्या कठोर निर्णयामध्ये शिवसेना कायम भाजपच्या पाठीशी राहील, आज कलम ३७० हटवल्यानंतर कश्मीरी जनतेला न्याय मिळाला आहे, भाजपशी पुन्हा युती करताना आम्ही मंत्रीपद, खुर्च्या नाहीतर कलम ३७० आणि राम मंदिराची अट घातल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आत्म्याला शांती मिळाली, आता वर्षभरात राम मंदिराचा निकालही वर्षभरात लागावा, अशी भावना राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

कलम ३७० हटवण्याचे विधेयक आज लोकसभेत

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचे विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात आले, गृहमंत्री अमित शहा यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर मोठा गदारोळ झाला. मात्र तरीही शेवटी बहुमताने त्याला मंजुरी देण्यात आली आहे. आज अमित शहा यांनी लोकसभेत कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सरकारने आजच लोकसभेतही कलम ३७० हटवण्याला मंजुरी मिळवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

तर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनणार

जुम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवतानाच लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या

विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरसह लडाख हे केंद्रशासित
प्रदेश असणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० कलम हटवण्याचे विधेयक मांडताच विरोधी पक्षांनी थयथयाट केला आहे.

घटनेतील ३७० कलम हटवण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचे हे आहेत फायदे

१) काश्मिरसाठीची वेगळी घटना व झेंडा संपुष्टात

२) काश्मिरात मालमत्ता विकत घेण्याचा आता भारतीयांना अधिकार

३) काश्मिरी नागरिकांचे दुहेरी नागरिकत्व यापुढे संपुष्टात

४) भारतीय संसद यापुढे काश्मिरसाठीही सर्वोच्च ठरणार

बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं, अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

काश्मीरच्या मुद्द्यावरून काका-पुतणे आमने सामने, अजित पवारांनी केलं विधेयकाचं स्वागत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!