Share

Solapur | कौतुकास्पद! राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे अवचित साधून सोलापूर जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन, छत्रपती शिवाजी वरिष्ठ महाविद्यालय ,महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने व महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्य संघटनेचे राज्यअध्यक्ष माननीय श्री सुनील रघुनाथ पूर्णपात्रेजी व राज्य संघटनेचे सचिव श्री रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 10:वी सीनियर व 9वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन जिल्हा लॉन टेनिस कोर्ट , कुमठा नाका , सोलापूर येथे करण्यात आले होते.

राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोलापूर दक्षिणचे गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांमध्ये मुंबईचा विशाल जाधव तर मुलींमध्ये सोलापूरची ज्योस्त्ना मदने सिंगल प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केलं आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष राजीव देसाई हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती गटशिक्षणाधिकारी उत्तर सोलापूर चे श्री बापूराव जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, क्रीडा अधिकारी व सदर वरील स्पर्धे साठी निरीक्षक म्हणून खास शासनाने नेमणूक केलेले उपस्थित होते.

या बक्षीस समारंभ प्रसंगी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री दशरथ गुरव सर यांची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या टीम मॅनेजर म्हणून निवड झाल्याबद्दल राज्य संघटनेचे सचिव श्री रवींद्र सोनवणे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला

सदर स्पर्धेस खलील प्रमाणे पंचांची नेमणूक सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे राज्याध्यक्ष माननीय श्री सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांनी केली.
या स्पर्धेला पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच श्री निलेश हारदे (औरंगाबाद,) संजय नागरे (उस्मानाबाद), राम हंबर्डे सांगली , संदीप व्यवहारे (जळगाव ) अर्चना पाटील (सांगली ) सुधीर सालगुडे, महेश झांबरे, उमेश बडगिरे, विनोद मोरे कार्तिक भंडारी चंद्रकांत वाघमोडे बालाजी केदार ( सोलापूर) यांनी काम पाहिले.

Solapur

विशेष म्हणजे सदर स्पर्धेत कोणत्याही संघाची कोणतीही तक्रार आली नसल्याने वरील पंचांनी त्यांची चांगली भूमिका बजावली या बाबत श्री सुनील पूर्णपात्रे अध्यक्ष यांनी समाधान व्यक्त केले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्य क्रीडा अधिकारी श्री नितिन तारलकर व त्यांच्या कार्यलयातील सर्वांची साथ लाभली. सदर राज्य स्पर्धा ह्या व्यवस्थित पार पडल्याचे श्री रवींद्र सोनवणे यांनी समाधान व्यक्त केले.

दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र ऑलम्पिक अससोसिएशन ची , क्रीडा व युवक संचालनालयाचे नवे आयुक्त मा. श्री सुहास दिवसे साहेब , तसेच सर्व असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत मिटिंग बालेवाडी , पुणे येथे असल्याने माननीय श्री सुनील पूर्णपात्रे यांना सदर मिटींगला जावे लागल्याने त्यांनीं सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!