🕒 1 min read
मुंबई : रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ हास्य कलाकार, अभिनेता राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून दाखवल्या. विनोद निर्मितीतून ते भाषा आणि प्रांत यांच्या सीमा ओलांडून घराघरांत पोहचले. त्यांनी कलाक्षेत्रातही रचनात्मक असे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | फक्त 5 मिनिटे! नखांवर घालवलेला थोडा वेळ तुमच्या आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या!
- Shivsena | “राज्यात दसरा मेळाव्यावरुन महाभारत होणार”, शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा
- Sharad Pawar | “…याचा आनंद आहे”, वेदांता प्रकल्पावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
- Free OTT Subscription | Netflix, Amazon Prime सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध, फक्त ‘हा’ सोपा मार्ग फॉलो करा.
- Dussehra Melava | उद्या होणार हायकोर्टात सुनावणी! दसरा मेळावाबाबत शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
