Share

Sharad Pawar | “पत्राचाळ प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करा”, शरद पवारांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. १०३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांना अटक केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्राचाळ प्रकरणी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीबाबत विचारण्यात आलं. तसेच ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये तुमचं नाव आल्याचंही पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. यावर पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा, जितक्या लवकर करायची तेवढी करा, चौकशीला आम्ही नाही म्हणत नाही पण पराचा कावळा करू नका, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

वेदांता-फॉकस्कॉन महाराष्ट्रात झाला असता तर…-

वेदांता-फॉकस्कॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही म्हणून काय झाले देशात कुठेतरी होत आहे याचा आनंद आहे. परंतू महाराष्ट्रात झाला असता तर जास्त आनंद झाला असता, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर हे जरी असले तरी मी विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नसल्याचंही शरद पवार यांनी परिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत तुरुंगात आहेत. मात्र नुकतंच सोमर आलेल्या माहितीनुसार या घोटाळ्यात शरद पवार देखील सहभागी असल्याचा आरोप समोर आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!