Breaking । मुंबई : गुजरातमधील मोरबी याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी झाल्याचं स्थानिक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तोच आज दुसरीकडे सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून काही वेळापूर्वीच ही घटना सांगोला – मिरज मार्गावरील जुनोनी गावाजवळ घडली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कोल्हापुरातील वारकऱ्यांची दिंडी आज सायंकाळी ७ वाजता सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी एमएच १२ डीई ७९३८ ही टाटा नेक्सॉन कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. या अपघातात पाच महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असल्याचे समाजत असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray । “माझ्याशी समोरासमोर चर्चेला या,” आदित्य ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना खुलं आव्हान
- Devendra Fadnavis । बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते; फडणवीसांचा गौप्यस्फोट
- Aditya Thackeray । “फडणवीस खोटं बोलले, मविआनं आणलेल्या प्रोजेक्ट्सचं क्रेडिट घेतलं”; आदित्य ठाकरेंनी केली पोलखोल!
- Beauty Sleep Benefits | का घ्यावी ब्युटी स्लिप?, जाणून घ्या फायदे
- Devendra Fadnavis । महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केलं, त्यामुळे हे उद्योग राज्याबाहेर गेले; फडणवीसांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

